Monday, March 7, 2016

सप्तरंगी संवाद

हा आहे सतत आपला स्वतःशीच सुरु असलेला संवाद, तो तर कायम सुरूच असो पण मग तो सप्तरंगीच का ? काळा , पांढरा , लाल, निळा का नाही ? तर येणारे विचार कधीच एका रंगात असे नसतात, सगळेच विचार दोन रंगात, काळ्या आणि पांढऱ्यात (हीच उच्चांकाची परिसीमा समजून ) चांगल्या वाईटात वेगळे करता येत नाहीत. एकाच वेळी आपण दुख्खी , आनंदी , उदास किंवा निर्विकारहि असतो म्हणजेच पांढरे शुभ्र विचारांना हि करडी किनार असतेच. म्हणूनच एकाच वेळी आपण आपल्या भावनांचे वेगेवेगळे पदर उलगडत असतो. 

म्हणूच सप्तरंगी, विविध रंगांनी रंगलेला संवाद !!