ऐतिहासिक नोंदी : बाजीराव मस्तानी न पाहताच आलेले शहाणपण :
1. सगळेच शहाणपण येण्यासाठी movie पहायची नाही तर fb , मिपा , नेट नेटाने चाळायची गरज असते.
2. आत्ताच आलेल्या सूत्रांनुसार यापुढे उठसुठ कुठल्याही सुमार गोष्टींसाठी पाकिस्तानात जा असे म्हणायची गरज नाही तर सरळ बाजीराव-मस्तानी पहा असेही म्हणू शकतो, equal आणि उचित अपमान केल्याचे श्रेय पदरी पडेल.
3. बाजीराव (युद्ध?)कला निपुण, शूर-वीर, सलग लढाया जिंकणारा वगैरे नक्कीच होता पण ते युद्धात कि अजुन कशाकशात हे फक्त भन्साळीच सांगू शकतात, त्यासाठी इतिहास वाचायची गरज नाही कारण तो इतिहास आता इतिहासात जमा झालेला आहे आणि भन्साळीनी तो नव्याने घडवला आहे याची नोंद घ्यावी.
4. Zero figure हि संकल्पना अशातली नसून फार पूर्वीपासूनच त्याची मुळे रोवली गेलेली आहेत. त्यामुळे सर्व जिमधारकांना आणि dietitians वर पेटंट चोरल्यामुळे दंड व कर आकारण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
5. सालसा , डिस्कोथेक , डान्सफ्लोर , इत्यादी अंगविक्षेप पुर्वीपासुनच आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक होते तर योगा , भरतनाट्यम, कथ्थक इत्यादी प्रकार अगदी आत्ताआत्ताचे आहेत. नवनवीन सालसा, डान्सफ्लोर (खर तर डान्सबार) काढून आपली संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवायचेच असे सरकारचे धोरण आहे.
6. तेंव्हाचे तंग आकार उकार दाखवणारे कपडे आपले आत्ताचे मागासलेपण दाखवतात, आपण आपल्या ढगळ अंगभरून कपडे घालण्यामुळे आपण एका मुलाला कपड्यांपासून वंचित तर ठेवत नाही यावर चर्चा सुरु आहेत. खरे तर आत्ता थोडेफार जे कमी कपड्यातील पिक फोफावलेले दिसते आहे त्याचे श्रेय मस्तानी आणि काशीबाई म्हणजेच सर्वार्थाने बाजीराव यांजकडे आहे.
7. सर्वधर्म समभाव . द्वि- भार्या पद्धती या आपल्या पुढारलेल्या पूर्वजांनी पूर्वीच अंगीकारलेले होते, आपल्याला आपली संस्कृतीची खर्या अर्थाने जतन करायची असेल तर आपणास हे परत सुरु करायला हवे. प्रत्येकास किमान दोन बायका असणे अपेक्षित आहे. तरच भन्साळीचा उद्देश सफल संपुर्ण होईल.
यावरून एकूणच आपले पुर्वज कित्येक गोष्टींचे पुरस्कर्ते होते आणि किती किती पुरोगामी विचारांचे होते ते कळुन येते. त्यामुळेच ते मस्तानी आणि काशी हा वाद खर तर फोल ठरतो.
ऐतिहासिक नोंदी आणि त्याबरोबरच बाजीराव मस्तानी न पाहताच आलेले शहाणपणही संपले याची तमाम वाचकांनी नोंद घ्यावी:)
Shilpa