Friday, November 20, 2015

मित्र

मित्र

माझा मित्र फक्त मीच बनावे

मनातले सगळे सल सांगायला
आणि ते अगदी तसेच्या तसे समजून घ्यायला
कायम मला अभिप्रेत असलेलाच अर्थ लावायला

नवीन तीरपांगडे विचार जोजवायाला 
कधीच मी चुकतोय असे न सांगायला
आणि प्रत्येकच गोष्टीवर गुमान मान डोलवायला

माझे तिरकस अतिरेकी तोडगे सरळपणे मानायला
माझ्याशी मनमुराद गप्पा मारायला 
आणि माझ्याच कानांनी माझे बोलणे ऐकायला !!


2 comments:

  1. कधीच मी चुकतोय असे न सांगायला
    आणि प्रत्येकच गोष्टीवर गुमान मान डोलवायला..

    माझा मित्र फक्त मीच बनावे
    ☺️☺️👌

    ReplyDelete